Home सामाजिक खुटवंडा येथील कॅन्सरग्रस्थाला  आर्थिक मदत 

खुटवंडा येथील कॅन्सरग्रस्थाला  आर्थिक मदत

1172

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम 

भद्रावती : तालुक्यातील ताडोबा अंधारी प्रकल्पाला लागुन असलेल्या खुटवंडा येथील कॅन्सर रुग्ण गजानन पाटील तसेच काटवल येथील मनोहर गजभीय या रुग्णास  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे उपक्रम श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत उपचाराकरीता आर्थीक सहकार्य करण्यात आले.

.         स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था असून समाजातील गोरगरीब-गरजू व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, गरीब शेतकरी तसेच समाजातील दुर्बल घटक यांना न्यासच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक मदत करीत असते. ट्रस्टच्या उद्देशानुरूप समाजाच्या मदतीकरीता वेगवेगळे  असे मुख्य सात अभियान राबवीत आहे.

.         खुटवंडा येथील गजानन पाटील हे कॅन्सर रोगानी ग्रस्त असून उपचार सुरु आहे तसेच काटवल येथील मनोहर गजभिये हे दुर्धर आजाराने ग्रस्त असून आर्थीक परिस्थीतने कुमकुवत असल्यामुळे आर्थीक मदतीकरीता चिचोली येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मालेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मुधोली सरपंच बंडू नन्नावरे यांच्या संपर्कात आलेत. गोर गरीब लोकांच्या परिस्थीतीची जाणीव असल्यामुळे संबंधीत कार्यकर्ते यांनी ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे तसेच अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्याशी संपर्क साधत मदतीकरीता विनंती केली. संपुर्ण परीस्थीती लक्षात घेता रुग्णांना पुढील उपचाराकरीता ट्रस्टच्या माध्यमातून धनादेशव्दारे आर्थीक सहकार्य करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टच्या कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजणे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगर सेवक नरेन्द्र पढाल, मुधोली सरपंच बंडूपाटील नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, राहुल मालेकर, विलास पडवे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यवाहक तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!