नव्या ठाणेदारांसमोर आव्हान
गडचांदूर : औद्योगिकीकरनाणे नटलेल्या गडचांदूर व नांदा फाटा या दोन्ही शहराचा सहभाग गडचांदूर पोलीस ठाणे अंतरंगत होतो. याच दोन शहरात अवैधधंद्याचे प्रस्थ वाढू लागले आहे मात्र त्यांना आवर घालण्यासाठी तत्कालीन ठाणेदार शिंदे अपयशी ठरल्याने, अवैध धंद्याचा महापूर आल्याचे नागरिक बोलत आहे.
. गडचांदूर परिसरात चार सिमेंट कारखाने असल्यमुडे ओव्हरलोड वाहतूक, अवैध वाहतूक भरमसाठ असल्यामुळे, अपघाताचे प्रमाण खूप जास्त आहे. पैनगंगा नदीच्या पात्रातून होणारी वाळू तस्करी हि गुन्हेगारी प्रवृत्ती धारण करीत आहे. गडचांदूर सारख्या औद्योगिक नगरीमध्ये विशेष करून पिंपळगाव रोड या परिसरात चालणारा सट्टा बाजार याशिवाय विशेष दिवशी होणारी जनावरांची कत्तल, अवजड अवैद्य वाहतूक, माणिकगड पहाडावरून होणारी जंगल संपत्तीची तस्करी, आजूबाजूच्या खेड्यापाड्या बीबी नांदा फाटा आवड पुर याशिवाय ग्रामीण भागात शेत शिवारात चालणारा जुगार अड्डावक कोंबड्यांचा बाजार लुडो या ऑनलाइन खेळाच्या नावाखाली चालणारा लाखो रुपयाचा जुगार गडचांदूर नांदा क्षेत्रामध्ये परवानगी असल्याबाबतचा बताना करून दिवसाढवळ्या चालू असलेले ऑनलाइन लॉटरी केंद्र, व त्याच्याच नावाखाली चालणारा सट्टा बाजार, याशिवाय गडचांदूर भोयेगाव महामार्गावर सुरू असलेले अवैद्य कोळसा विक्रीची दुकान, एवढेच नव्हे तर कवटाळा बोरगाव मार्गाच्या दरम्यान रात्रीच्या वेळेला होणारी अवैद्य कोळसा वाहतूक व विक्री, त्याचप्रमाणे अनेक खेडे गावामध्ये पालगाव नोका री अवारपूर बीबी येथे अनुज्ञप्ती क्रमांक नसताना सुद्धा करून रात्री दहाच्या नंतर व सकाळी दहा वाजेपर्यंत चालणारी अवैद्य दारू विक्री अशा असंख्य अवैद्य धंद्यांना या क्षेत्रामध्ये भरगच्च असा ऊत आलेला असून याशिवाय रात्रीच्या वेळेला होणारी घरफोडी व चोरीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले असून काही महिन्या अगोदर अल्ट्राटेक वसाहतीत झालेली लाखो रुपयाची चोरी अनुकतीच काही दिवसापूर्वी नांदा फाटा येथे झालेल्या विविध घरफोड्या याबाबतीत अजूनही कोणतेही धागेदोरे पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये लागले नसून यांच्या कार्यक्षमतेवर जनतेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
. शिवाय दोन ते तीन सिमेंट कारखाने व पुरुषाच्या खाणी असल्यामुळे भंगार व्यावसायिक सुद्धा दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे त्यामुळे नव्यानेच रुजू झालेले गडचांदूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राज कमल वाघमारे हे या सर्व परिस्थितीकडे कोणत्या दृष्टीने बघतात व कशा पद्धतीने हाताळणी करतात याकडे सर्व गडचांदूर परिक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.