आनंद निकेतन महाविद्यालयात स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड विषयी व्याख्यान संपन्न

431

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम गुरुवारी दि. 8 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमित चीलबुले होते. विद्यार्थ्यांना करिअर बनविण्यासाठी डायरेक्शन क्लियर असणं किती गरजेच आहे. तसेच शेअर मार्केट हा करिअर बनवण्याचा उत्तम मार्ग कसा आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

.          यशस्वी जीवन जगण्यासाठी बदल कसा गरजेचा आहे तसेच अवघड हे आहे की कोणत्याही बदलाची सुरुवात शून्यापासून करावी लागते. असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यशस्वी होण्यासाठी यशस्वी व्यक्तीचा सहवास असणे फार आवश्यक आहे. हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना फार हसत खेळत दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुद्धा सगळी माहिती हसत खेळ समजून घेतली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी इन्व्हेस्टमेंट करिता बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे हेविद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

.          कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. कल्पना काळे यांनी केले तर संचालन प्रा. विशाखा डोंगरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. टिपले यांनी केले. कार्यक्रमाकच्या यशस्वीते करिता वाणिज्य विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक डॉ. चौधरी, डॉ.पल्लवी वैद्य, प्रा. संदीप ताजने, प्रा.आशिष येटे, प्रा. मंगेश मेश्राम, प्रा. राहुल टोंगे, प्रा. फराना शेख. आणि प्रा. चेतना पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.