Home Breaking News भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

1282

वरोरा : सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने ८ फेब्रुवारीला भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

.          या शिबिराच्या उद्घाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, (नि वै अ.) डॉ हेमचंद कन्नाके, उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खूजे, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रतीक बोरकर, डॉ विरुटकर, डॉ. बोरकर उपस्थित होते.

.          शिबिराचे प्रास्ताविक करताना डॉ चिंचोळे यांनी तालुक्यातील फ्लोराइड युक्त पाण्याच्या वापराने अस्थी व दातावर झालेल्या परिणामावर या शिबिरात होणाऱ्या उपचार याची माहिती विषद केली. उद्घाटकनिय भाषणात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सेवा व सुविधा बाबत समाधान व्यक्त करीत नागरिकांनी या शिबिरात होणाऱ्या विविध तज्ञ डॉक्टर, सावंगी मेघे येथील वैद्यकीय चमू कडून उपचार व होणाऱ्या शस्त्रक्रिया यांचा लाभ घ्यावा असं आवाहन केले. तसेच १०० खाटाच्या रुग्णालय इमारत बांधकाम निधी पाठपुरावा या बाबत माहिती दिली. शिबिराचे निमित्ताने पोषण आहार विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र व क्षय रोग, एन सी डी, किटकजन्य रोग, सिकल सेल, आदी विभागाचे आरोग्य शिक्षण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ खुजे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. शिबिरा करिता सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले. तर संचालन गोविंद कुंभारे व सोनाली रासपायले यांनी केले.

error: Content is protected !!