वासेरा येथे माता रमाई जयंती साजरी

42

सिंदेवाही :-  त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त वासेरा येथील रमाबाई महिला मंडळाच्या वतीने बुधवारी श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात अभिवादन समारोह घेण्यात आला. या निमित्ताने रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा ग्राम पंचायत सदस्या अस्मिता प्रवीण रामटेके यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.   चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याला ग्राम पंचायत सदस्य महेंद्र सूर्यवंशी यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले. तर रमाबाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माता रमाई यांना पुष अर्पण करून अभिवादन केले.

.         याप्रसंगी महेंद्र कोवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माता रमाई यांनी बाबासाहेबांची सावली बनून त्यांच्या कार्याला साथ दिली. म्हणून बाबासाहेब घडले. बाबासाहेबाना घडविण्यात माता रमाईचा मोठा वाटा आहे. आणि त्यामुळेच आपण सर्व आज मानाने उभे आहोत. त्यामुळे माता रमाईचा त्याग विसरता येणार नाही. कार्यक्रमासाठी रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अस्मिता रामटेके, उपाध्यक्षा सारिका कोवले, आरती लोणारे, दीपमाला मेश्राम, प्रियतमा सूर्यवंशी, इंदू लोणारे, यांचेसह, असंख्य महिलांनी परिश्रम घेतले. बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.