Home सामाजिक विसापुरात रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

विसापुरात रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

1303

जयंती निमित्त धम्म भूमी परिसरातून निघाली मिरवणूक

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रबोधन कार्यक्रम

विसापूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या जडणघडणीत व देश हिताच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी म्हणून मोलाचे सहकार्य केले.त्या माता रमाईचा आंबेडकरांचा त्याग महत्वाचा आहे. त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्य येथील धम्मभूमीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.

.          बल्लारपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभा शाखा अध्यक्ष संजय वानखेडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर, बल्लारपूर उपविभागाचे सहायक अभियंता शामला भाले, भारतीय बौद्ध महासभा सचिव सचिन पुणेकर यांची उपस्थित होते.
दरम्यान माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा व गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रीना चिकाटे यांनी केले.आभार सचिन पुणेकर यांनी मानले.यावेळी समाज बांधवांची उपस्तिथी मोठ्या प्रमाणात होती.

error: Content is protected !!