गडचांदूरच्या शैक्षणिक विकासात आदर्श हिंदी विद्यामंदिरचे योगदान उल्लेखनीय : आ. सुभाष धोटे

488

कोरपना : गडचांदूर परिसरातील एकमेव हिंदी भाषिक विद्यालयाची स्थापना बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ, गडचांदूरच्या पुढाकारातून झाली. माणिकगड सिमेंट कंपनीच्या सहकार्याने १९९५ मध्ये गडचांदूर येथे ही स्थापना करण्यात आली. बुधवार व गुरुवारी विद्यालयात दोन दिवसीय रोप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.         महोत्सवाचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट गडचांदूरचे युनिट हेड अतुल कन्सल, मुकेश गहलोत, नवीन कौशिक, संस्थेचे सचिव बाळासाहेब मोहितकर, नगराध्यक्ष सविता टेकाम, संचालक विठ्ठल थिपे, वामन मत्ते, अशोक जीवतोडे, नगरसेवक पाप्पया पोन्नमवार, विक्रम येरणे, राहुल उमरे, रऊफ खान वजीर खान, सचिन भोयर, खिर्डीचे उपसरपंच दिपक खेकारे, संतोष महाडोळे, प्रभाकर पारखी, मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मत्ते यांची उपस्थिती होती.

.         रौप्य महोत्सवी कार्यक्रमात विद्यालयाच्या विविध क्षेत्रात कार्यरत २५ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष  मुकेश गहलोत, सचिव बाळासाहेब मोहितकर, ज्येष्ठ शिक्षक देवप्रकाश पोतदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विभिन्न स्पर्धेत विजयी ठरलेल्या माता-पालकांचा, कुस्ती स्पर्धेत विभागावर नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, शालेय क्रीडा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा पंकज मत्ते लिखित स्वातंत्र्य सेनानी जानकीबाई आपटे एक असाधारण व्यक्तिमत्व या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. मंजुषा मते यांनी केले. संचालन पुरुषोत्तम निब्रड व अनंत काळे यांनी तर आभार राकेश गोरे यांनी मानले.