Home सामाजिक विवेकानंद महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा

विवेकानंद महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा

1319

मुल : विवेकानंद महाविद्यालय बेंबाळ येथे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण देशात वादाचा विषय ठरलेल्या इव्हीइम ला अनुसरून भारतीय निवडणूक प्रक्रियेत इव्हीइम प्रदर्शक भूमिका बजावते काय?  या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

.           या स्पर्धेत सिद्धी माधव अलोनी आणी गौरी संजय शेरकी या बीएससी च्या विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेत शूरवी महिला महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले. दोन्ही विद्यार्थिनींनी वादविवाद स्पर्धेत प्रभावीपणे आपली बाजू मांडली. यामध्ये सिध्दी आलोनी प्रथम वर्ष  हिने  होय च्या बाजूने बोलतांना द्वितीय क्रमांक पटकावला. तिला प्रमाणपत्र नगदी रक्कम व ट्रॉफी देऊन मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.

.           तिच्या यशाबद्दल श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष कापर्तीवार व सचिव सुरावार, महाविद्यालयच्या प्राचार्या हर्षा खरासे आणी महाविद्यालयच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी सिद्धीच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

error: Content is protected !!