नागभीड येथे आज झाडे कुणबी समजाचा स्नेहमिलन सोहळा व गुणवंतांचा सत्कार

580

 

नागभीड : नागभीड येथे झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने झाडे कुणबी समाजाचा स्नेहमिलन सोहळा ,गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या सन्माननिय व्यक्ती व स्त्रियांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि.04 रोज रविवारला सकाळी 11 वाजता रुख्मिणी सभागुह नागभीड येथे आयोजित केलेला आहे.

.                     या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किर्तीकुमार भांगडीया ,आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक जितेन्ददादा आसोले ,युवा प्रबोधनकार ,कवि व व्याख्याते गोदिंया, कार्यक्रमाचे अध्यक्ष :- ॲड . गोविंदराव भेंडारकर , नोटरी,भारत सरकार हे आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी गजानन पाथोडे ,संचालक जि.म मा.सह.बँक चंद्रपूर , नरेंद्र हेमणे ,संचालक कृ.उ.बा.समिती नागभीड ,रामदास बहेकार,अध्यक्ष दक्षता समिती , नगरपरिषद नागभीड , आनंद कोरे, अध्यक्ष संजय गाधी निराधार योजना तालुका नागभीड तथा सरपंच ग्रामपंचायत मेंढा,विलास दोनोडे, माजी सभापती कृ.उ.बा.समिती नागभीड, सुनिल शिवणकर,सदस्य संजय गांधी निराधार योजना तालुका नागभीड ,यशंवराव भेंडारकर, उपसंरपच ग्रामपंचायत कोटगाव, अनिल बहेकार , निर्मला पाथोडे , रुपाली कठाणे, मालु ब्राम्हणकर , हे असतील .

.                 कार्यक्रमास समाज बांधवानी सहकुटुंब उपस्थित राहून समाज प्रबोधनाचा लाभा घ्यावा तसेच गुणवंताचा उत्साह वाढवावा असे. आवाहन संघटनेचे अध्यक्ष सचिन कठाणे ,सचिव सुरज भेडारकर ,कोषाध्यक्ष विजय भेंडारकर सहसचिव – बबलु शिवणकर , गुरुदेव शिवणकर रितेश कोरे, गुरुदेव शिवणकर कार्याध्यक्ष शिवशंकर कोरे , मार्गदर्शक शिवशंकर भेंडारकर व श्रीपतराव मटाले यांनी केले आहे.