मुल : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झालेल्या ३७ व्या दीक्षांत समारंभात डॉ. अपर्णा मन्मथ ढेले – कासराळे यांना कृषी विस्तार शिक्षण विभागातील संगमनेरी शेळी वरील संशोधनासाठी त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
. बँक ऑफ इंडिया शाखा बेबाळ इथे सध्या कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या डॉ. अपर्णा मन्मथ ढेले – कासराळे यांना कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते आचार्य पदवी (पीएचडी) देण्यात आली. मुलं चे तालुका कृषी अधिकारी कासराळे यांच्या त्या सुविद्य पत्नी असुन त्यांना सध्या त्या बँक ऑफ इंडिया बेंबाळ शाखेत कार्यरत आहेत. त्याच्या यशाबद्दल त्याच्या वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षावं होत आहे.


