प्रवाशांना घ्यावा लागतो दुकानाचा आधार
आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?
व्यथा दुर्लक्षित शहराची : भाग – 1
मारोती चाफले
गडचांदूर : तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही, त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्याथों व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहतात. मागील तीन दशकांपासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही, त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे.
. गडचांदूरमध्ये बसस्थानक न होण्याचे कारण म्हणजे जागा उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत जागा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याचे ऐकण्यात येत नाही. सिमेंट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जमिन अधिग्रहित करुन ठेवल्यामुळे गडचांदुरमध्ये जमिनीची उपलब्धता कमी आहे. बसस्थानकाची जबाबदारी शासनाने कंपन्यांवर सोपविल्यास कंपन्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र कंपन्या मदत करण्याच्या मानसिकतेत नाही. परिणामी प्रवाशांना हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ![]()
. गडचांदूर शहर कोरपना तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व दालमिया या चारही सिमेंट कंपन्या गडचांदूरच्या अवती-भोपती आहे. त्यामुळे गडचांदूरला विशेष महत्त्व आहे. कोरपना व नियती या दोन्ही तालुक्यातील ग्राहकांना कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता गडचांदूरला आल्याशियाय पर्याय नाही. गडचांदुरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानक मधील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते.
. कोरपना व जिवती तालुक्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात, ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांबा संबंध बसस्थानकाशी येतो, मात्र येथील २५ बाय ८ क्षेत्रफळाच्या बसस्थानकात या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. या बसस्थानकात राजुरा आगाराचे छोटे कार्यालयसुद्धा टपरीवजा शेड मध्ये सुरु करण्यात आले. गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, दोन अध्यापक विद्यालये, बी.एड. महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गडचांदुरात शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रधाशांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत बसची पाट बघावी लागते. आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने बसस्थानक होतील, अशी अपेक्षा आहे.
विद्यार्थिनींना मजनूंचा त्रास शाळा सुरू होताना व सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना बसची वाट पाहावी लागते. बसस्थानकावर बसायला जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही दुकानाचा व हॉटेल्सचा आसरा घेऊन बसावे लागते. याचाच फायदा घेत काही मजनु विद्यार्थिनी च्या आजू बाजूला घिरट्या मारतांनी दिसून येत आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनिवर आला आहे.
अतिक्रमित ओपनस्पेसवर तात्पुरता निवारा उभारावा राजुरा – गोविंदपूर महामार्गावरील बसस्थानक शेजारील ओपनस्पेस अतिक्रमण ग्रस्त आहे. नगरपालिकेने पुढाकार घेऊन अतिक्रमण काढून प्रवाशी व नागरिकांसाठी तात्पुरता स्वरूपाचा का होईना प्रवाशी निवारा उभारावा अशी नागरिकांची मागणी आहे.
आ .सुभाष धोटे कडून अपेक्षा राजुरा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांचे पुढाकाराने गडचांदूरला शहराचा दर्जा प्राप्त झाला, आता त्यांची दुसरी टर्म मध्ये गडचांदूर शहराला बसस्थानक उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा नागरिक धरून आहे.

