भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने धम्म उपसिका शिबिर

32

    एकाच दिवशी दोन शिबिराचे आयोजन   

सिंदेवाही

.          भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अर्तगत तालुका शाखा सिन्देवाही च्या वतीने दहा दिवसीय महिला धम्म उपाशिका शिबिर आयोजित केले असून एकाच वेळी दोन ठिकाणी महिला धम्म उपाशिका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.          भारतीय बौध्दमाहासभेच्या वतिने दरवर्षी विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून ग्रामीण भागातील बौद्ध बांधवांना भारतीय बौध्दमाहासभेच्या वतिने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व महिलांना धम्म आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने नुकतेच तालुक्यातील ग्राम शाखा नैनपुर, आणि चिकमारा या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी महिला धम्म उपासिका शिबिर आयोजित करण्यात आले. या दोन्ही महिला धम्म उपाशिका शिबिराचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका शाखा सिंदेवाही सरचिटणीस प्रा. जगदीश सेमस्कर, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून बल्लारपूर येथील केंद्रीय शिक्षिका किरण रामटेके व मुलच्या उषाताई दुर्गे , जिल्हा कोषाध्यक्ष घनश्याम भडके, उपाध्यक्ष अशोक रामटेके उपाध्यक्ष लोमेश खोब्रागडे, तालुका कोषाध्यक्ष बलदेव चहांदे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कोवले, सिंदेवाही तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष मुकेश बन्सोड, संघटक मन्सराम साहरे, केवळराम साहरे अध्यक्ष ग्राम शाखा लोनखरी, अक्षय साहरे, अश्विनी किशोर लोनारे अध्यक्ष लोणखैरी, प्रविण डांगे सरचिटणीस नैनपुर, तसेच दोन्ही ग्राम शाखेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी शिबिर आयोजन करण्याचा उद्देश व्यक्त केला.