आनंद निकेतन महाविद्यायातील वाणिज्य विभागाच्या वतीने हैदराबाद येथे सहल

15

वरोरा

.          आनंद निकेतन महाविद्यायातील वाणिज्य विभागाच्या वतीने चेरलापल्ली हैदराबाद येथील नामांकित शुज कंपनीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी 29 डिसेंबर 2023 रोजी भेट दिली. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या कंपनीच्या सीईओ सत्यवती तसेच मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यनारायण यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कंपनीमध्ये मनापासून स्वागत केले.

.          कंपनीत प्रवेश करताच एक महिला  शुज  कंपनी किती यशस्वीरित्या चालवू शकते या कल्पनेने विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. सत्यवती यांनी विद्यार्थ्यांना कंपनी विषयी फार मोलाची माहिती दिली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी ही कंपनी सुरू केली हे ऐकून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा खूप अभिमान वाटला.  तुमचा आत्मविश्वास जर प्रखर असेल तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात  यशस्वी होऊ शकता असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मी तुमच्या सारखेच एका ग्रामीण भागातून आलेली महिला आहे केवळ आत्मविश्वासामुळे मी हे ध्येय साध्य करू शकली.  असे आपल्या बोलण्यातून त्यांनी व्यक्त केले. माझ्यासारखे तुम्ही सुद्धा एका कंपनीचे मालक होऊ शकता यात काहीच  दुमत नाही  अशी प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. कॉमर्स सेक्टर मध्ये विकासाच्या कशा संधी उपलब्ध आहे. याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.

.          एका कंपनीची सीईओ एक महिला आपल्यासमोर खंबीरपणे उभे राहून व्यवसायाकडे वळा हे मार्गदर्शन करताना पाहून विद्यार्थी फार भारावून गेले. वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. कल्पना काळे यांच्या नेतृत्वात आणि प्रा.आशिष येटे, प्रा.संदीप ताजने, प्रा.टिपले,  प्रा, विशाखा डोंगरे, प्रा. स्मिता पांढरे प्रा .मंगेश मेश्राम यांच्या सहकार्यात या सहलीचे यशस्वी आयोजन झाले.