रोलर अथेलिटिक्स मध्ये मिळाले रौप्यपदक : चंद्रपूर जिल्ह्याचा मान उंचावला
विसापूर
. बल्लारपूर येथील गुरुनानक पब्लिक स्कुलचा ७ वर्षाचा विद्यार्थी युआंश मेनावार याने रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे पार पडलेल्या रोलरस्केटिंग स्पर्धेत ४00 मिटरच्या स्पर्धेत राज्यस्तरावर रौप्यपदकाची कमाई करून चमकला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या स्पर्धेत राज्यभरातून ४,७ व १२ वयोगटातील १४00 बाल स्केटिंगपटू सहभागी झाले होते.यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सुमित रोलर स्केटिंग आकदमीचे प्रशिक्षित असलेले १४ रोलर स्केटिंग स्पर्धकांनी प्रतिनिधित्व केले होते.
. बल्लारपूर येथील रोलर स्केटिंगपटू युआंश मेनवारला आता राज्यस्तरावर रौप्यपदक प्राप्त झाल्यामुळे कर्नाटक राज्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी युआंश हा प्रशिक्षक सुमित बुटले यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे.
. अलीकडे नागपूर येथील सोमलवार स्कूल मध्ये रोलर स्केट बास्केटबाल राज्य अजिंक्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सलोनी देऊरमले, दिवांशी बावणे, अलिशा गवळी, नंदिनी जीवतोडे या विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील सुरत मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती आहे. बल्लारपूर येथील गुरुनानक पब्लिक स्कूलचे अध्यक्ष कैलाश खंडेलवाल, मुख्य शिक्षक, प्रशिक्षक सुमित बुटले येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक मार्गदर्शन, सोबतच क्रीडा कौशल्याब्द्दल प्रशिक्षण देत असल्यामुळे मैदानी क्रीडा प्रकारात शहरासह जिल्ह्यात चमकते तारे म्हणून नवलौकिक करत आहे.

