राखेच्या ढिगार्‍याखाली दबून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू

1663
  • नंदोरी खुर्द येथील गिट्टी खदानीतील घटना
  • मासे पकडणे बेतले जिवावर 
  • २० तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला

चंद्रपुर

.          . गिट्टी खदानीतील मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा राखेची दरळ कोसळ्याने राखे खाली दबून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नंदोरी खुर्द येथील पंकज जैन यांच्या गिट्टी खदानीत घडली. योगेश जंघेल (२७) तर रामचरण जंघेल (५२) असे मृतक बापलेकाचे नाव आहे .

.            वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी खुर्द येथे राहत असलेले रामचंद्र जंगेल व त्यांचा मुलगा योगेश जंगेल सह तेथीलच तीन युवक पंकज जैन यांच्या मालकीच्या गिट्टी खदान मध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते . खदानीला राखेचे पांघरून घातलेल्या ढीगार्‍यावर रामचंद्र व योगेश दोघेही आपल्या दुचाकीवर बसून होते तर तीन युवक त्यांच्या जवळच उभे राहून बोलत असताना अचानक राखेचा ढिगारा खचु लागला हे लक्षात येताच ढीगार्‍यावर उभे असलेले तीन जण पळून गेले तर दुचाकीवर बसलेले बाप लेक मात्र दुचाकीसह खदान मध्ये पडले . यात बाप लेकाचा दबून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नंदोरी खुर्द येथील पंकज जैन यांच्या गिट्टी खदानी मध्ये घडली , सदर घटना काल सायंकाळी ५वाजता च्या सुमारास घडली. ही माहिती क्रेशरवर राहत असलेल्या नागरिकांना माहीत होताच . नागरिकांनी रात्री एकच गर्दी केली होती . या घटनेची माहिती भटाळी च्या सरपंचांनी पोलीस प्रशासनाला देताच वरोराचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली . गिट्टीक्रेशर वर काम करीत असलेल्या युवकांनी खदान मध्ये उतरून शोध घेतला मात्र दोघांचाही मृतदेह सापडला नसल्याने बुधवारी सकाळ पासून जेसीबी व पोकलण च्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली यात तब्बल २० तासानंतर मुलाचा मृतदेह सापडला मात्र वृत्त लिहिपर्यंत वडीलाचा शोध लागला नसून शोध मोहीम सुरू आहे . दिवसभर शोध कार्य सुरू असून घटनास्थळावर वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल काचोरे , पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार , भद्रावतीचे तहसिलदार अनिकेत सोनवणे , सरपंच सुधाकर रोहणकर तळ ठोकून बसले होते .

मृतक योगेश जंघेल

गिट्टी खदानीला राखेचे पांघरून 

नंदोरी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात गिट्टी खदानी आहेत . या खदानीत क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केले असून ५० फुटा पेक्षा अधिक खोल येथील खदानी आहेत . गिट्टी क्रेशर व्यावसायिक श्रमतेपेक्षा अधिक उत्खनन करीत असल्याने आपलं घबाड लपविण्यासाठी मोहबाळा वसाहतीतील जिएमआर व साई वर्धा पावर या औद्योगिक कंपन्यातून निघणारी राख या खदानीत टाकून खदानीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहे. खदानित पाणी साचून असल्याने हे राखेचे ढिगारे हळूहळू खचत आहे यामुळे राखेचे ढीगर कोसळून आतापर्यंत अनेक अपघात घडले असे असतानाही गिट्टी व्यावसायिक खदान बुजविण्यासाठी सर्रास राखेचा वापर करीत आहे या मुजोर गिट्टी खदान मालकावर खनीकर्म विभाग व महसूल विभाग काय कारवाई करते की पुन्हा गिट्टी खदान मालकांसोबत साठ गाठ करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले