वरोऱ्याची पूर्वा घानोडे व फाल्गुनी कासावार महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात

47

वरोरा

.        लोक शिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोराच्या विद्यार्थिनी कुमारी पूर्वा गजानन घानोडे व फाल्गुनी राजू कासावार यांची खामगाव त. बार्शी जि. सोलापूर येथे झालेल्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय मुलींच्या वॉलीबॉल स्पर्धेमधून सिमोगा (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र मुलीच्या संघात उत्कृष्ट खेळीच्या आधारे निवड झालेली आहे. दोघींच्याही निवडीने लोकशिक्षण संस्थेच्या खेळाडूंची महाराष्ट्र राज्य शालेय संघात सतत निवड होण्याची परंपरा कायम राहिली असून वरोरा शहरात सर्वत्र दोघींचेही कौतुक होत आहे.

.        पूर्वा व फाल्गुनी ची निवड झाल्याबद्दल लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह विश्वनाथ जोशी, कार्यवाह श्री दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, कार्याध्यक्ष किशोर पिरके, मिलिंद कडवे, मुख्याध्यापक राखे, दीपक नवले, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गडचिरोली जिल्हाधिकारी श्री प्रशांत दोंदल यांनी अभिनंदन केले. पूर्वा व फाल्गुनी यांनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, अनिल घुबडे, निखिल बोबडे,दुष्यंत लांडगे, गणेश मुसळे, विनोद उंमरे, आई वडील व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोराच्या ज्येष्ठ खेळाडूंना दिले.