क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे वरोऱ्यात जंगी स्वागत

32

चंद्रपूर

.         क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वरोरा शहरातील रत्नमाला चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

.         क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर असताना नागपूर येथून चंद्रपूरला जात असताना वरोरा येथील रत्नमाला चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार संजय बनसोडे यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा-भद्रावतीचे विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच वरोरा तालुका क्रीडा संकुलन साठी विकास निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले त्यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भोयर व शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांचेकडून शहर व ग्रामीण ची क्रीडा विषयीची माहिती जाणून घेतली वरोरा येथील राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा मधून निवड झालेल्या ईश्वरी राऊत व सृष्टी चट्टे यांचे मंत्री महोदयाने कौतुक करून सत्कार केला.

.         यावेळी वरोरा स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे, पीरके विनोद उमरे, स्फुर्ती स्पोर्टींग क्लबचे सेक्रेटरी सुनिल जवदंड, राजू दोडके यांनी मंत्री महोदयाचे स्वागत केले, वरोरा तालुक्यातील प्रवीण सुराणा, तिरणीक, प्रवीण खिरटकर, निखिल विरुटकर, फकिरचंद कोटांगले, आणि शहरातील मुलं, मुली प्रामुख्याने उपस्थित होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे भद्रावती शहराध्यक्ष गितेश सातपुते, युवक अध्यक्ष दिनेश मोहरे, सुधाकर उपरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.