स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चा उपक्रम
अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजना
भद्रावती
. दिवाळी सण हा आनंद साजरा करण्याचा असला तरी तो आनंद स्वतः सोबत समाजातील निराधार, दुर्बल व वंचित घटकांसोबत वाटून घेतला पाहिजे ही भूमिका ठेवून सण दिवाळीचा, कर्तव्याचा, सत्कार्याचा म्हणून सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला.
. दिवाळी निमित्य स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर (र.न.६३५) तर्फे अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत ७६ मुले दत्तक घेतलेली आहेत. त्यांचे संपूर्ण पालकत्व ट्रस्ट करते. यापलीकडे अजून ५५ मुले दत्तक घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या ध्येय धोरणानुसार प्रक्रियेत आहे.
. दरवर्षी प्रमाणे दत्तक घेतलेली ही मुले बोर्डिंग स्कुल मधून दिवाळी साजरी करण्याकरिता ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे निवासस्थानी येतात. रविंद्र शिंदे यांचे घरी ही मुले दिवाळी साजरी करतात. या निमित्ताने त्यांचे आरोग्याबाबत विचारपुस तसेच त्यांना त्यांचे गरजेनुसार आवश्यक वस्तु पुरविल्या जातात.
. दि. १३ ला दिवाळी निमित्य गौरी रविंद्र शिंदे यांच्या हस्ते या मुलांना मिठाई वाटप करून, त्यांचे सोबत गप्पा गोष्टी करून दिवाळी साजरी करण्यात आली.
. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनराज आस्वले, सचिव रुपाली रविंद्र शिंदे, कोषाध्यक्ष मातोश्री सुषमा श्रीनिवास शिंदे, सेक्रेटरी संजय तोगट्टीवार, भद्रावती गुरुदेव सेवा मंडळाचे झनक चौधरी, भद्रावती तालुका प्रमुख तथा न.प. भद्रावतीचे माजी नगरसेवक नंदु पढाल व गोपाल सातपुते तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे सदस्य, आप्त परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.


