प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत नवतळा आश्रमशाळेच्या चमूने मारली बाजी

38

      43 खेडाळूची विभागीय स्पर्धेसाठी निवड     

नेरी

.             आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित प्रकल्प कार्यालय चिमूर अंतर्गत जाभुळघाट येथे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत नवतला येथील श्री स्वामी समर्थ अनुदानित आश्रम शाळेच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी करीत सुयश प्राप्त करीत उपविजेता करंडकावर नाव कोरले यात 17 वर्षे वयोगटातील खोखो व व्हॅलीबाल सर्धेत विजेतेपद पटकविले. तर कबड्डी स्पर्धेत उपवीजेते पद पटकीविले तसेच 14 वर्षे वयोगटात मुलींनी कबड्डी मध्ये तर मुलांनी व्हॅलीबाल मध्ये प्रथम क्रमांक घेत बाजी मारली तर वैयक्तिक स्पर्धेत 30 पेक्षा अधिक पारितोषिक मिळवले असून यात लांब उडी ,उंच उडी ,गोळा फेक यात नैपुण्य मिळविले कल्पतरु सिडाम, संगीता मडावी वैष्णवी सिडाम या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा पारितोषिक मिळविले.

.             या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर ,सहायक प्रकल्प अधिकारी मॅचिंद्र डुले तसेच चौधरी, कावळे मान्यवर म्हणून उपस्थित होते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू पुट्टावार, सचिव कल्पना पुट्टावार, मुख्याध्यापक सुधीर सुकारे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रवीण कामडी यांनी अभिनंदन करून कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत विजय प्राप्त करण्यासाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.