Home विदर्भ अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

834

 लोहारा बोथली शेतशिवारातील घटना 

नेरी

.          चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली लोहारा मार्गावरील नाल्याजवळील शेतशिवारात दि 15 ला पहाटे ६.३० वाजता एका मादी अस्वलाने शेतात जात असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून नेरी येथील रुग्णालयात नेले असता पुढील उपचारासाठी त्यांना चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.

.          लोहारा येथील शेतकरी संभाजी वारलू डांगे (70 ) हे दि 15 ऑक्टोबर ला पहाटे ६.३० वाजता शेतात गेले असता नाला ओलांडुन एक मादी अस्वल आपल्या दोन पिल्ले सह शेतात आली त्याच वेळी शेताची पाहणी करत असताना अचानक अस्वलाने शेतकरी डांगे यांचेवर जोरदार हल्ला चढवला यात ते बांधिवर खाली कोसळले अस्वलाने परत हल्ला चढवून त्यांच्या पायाचा जोरदार चावा घेतला मात्र हातात काठी असल्याने समयसुचकतेने काठीने अस्वलाला हुसकावताच अस्वल ने पहाडी परिसरात धूम ठोकली यानंतर डांगे यांनी स्वतःला सावरत कसे तरी उठून रस्त्यावर आले असता फिरायला येणाऱ्या मुलांनी त्यांना उचलून मदत केली तात्काळ त्यांना नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे नेरी वनपरिक्षेत्र चे क्षेत्रसहायक अधिकारी रासेकर यांनी डांगे यांची भेट घेतली व आरोग्याची विचारपूस केली यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे सदर घटनेने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली असून अस्वलाचे बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग व गावकरी यांनी केली आहे

error: Content is protected !!