Home सामाजिक १६ ऑक्टोबरला भास्कर पेरे पाटील स्मार्ट ग्राम बिबीत

१६ ऑक्टोबरला भास्कर पेरे पाटील स्मार्ट ग्राम बिबीत

828

‘ग्रामसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपुर

.            जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन, आवारपूर व कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील १६ ऑक्टोबरला सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे उपस्थित राहणार आहे.

.            भास्कर पेरे पाटलांच्या हस्ते तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा, गुणवंत विद्यार्थी व काही मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी तंबोला खेळाचे आयोजन करण्यात आले असून सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

.            ग्रामसंवाद या कार्यक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत बिबीच्या सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्राम विकास अधिकारी धनराज डुकरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

error: Content is protected !!