Home पोलीस डायरी मजूर घेऊन जात असलेल्या वाहनाचा अपघात

मजूर घेऊन जात असलेल्या वाहनाचा अपघात

797

दोन गंभीर : आठ किळकोळ जखमी

सिरपुर नेरी मार्गावरील घटना

नेरी

.            सिरपुर नेरी मार्गावर सोयाबीन पिकाच्या कापणीसाठी मजुरवर्ग सुमो गाडीने नेत असताना सिरपुर नेरी मार्गावरील संजय डोंगरे यांच्या शेताजवल दुपारी 4 वाजता दरम्यान सुमो गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी शेतात पलटी झाली यात दोन मजूर गंभीर जखमी झाले तर आठ मजूर किळकोळ जखमी झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली सदर जखमींना चिमूर उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

.            सविस्तर असे की सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीसाठी मजुरवर्गाचा लोंढा बाहेर जात आहे हाताला काम नसल्याने अनेक मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी जातात अश्यातच 10 ते 12 मजुरवर्ग घेऊन दि 9 ऑक्टोबर ला लाल रंगाचे सुमो क्र एम एच 44 बी 1017 ही गाडी सिरपुर मार्गे नेरीला जात असताना वाटेत संजय डोंगरे यांच्या शेताजवल अचानक गाडीचा टायर फुटल्याने सदर गाडी पालटली आणि सरळ शेतात घुसली यात 2 जन गंभीर जखमी झाले तर आठ मजूर किळकोर जखमी झाले सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तात्काळ वाहनांची व्यवस्था करून सर्व जखमींना उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले आहे सदर रुग्णावर उपचार सुरू असून वाहनावर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत

error: Content is protected !!