दुचाकी मालकाची पोलिसात तक्रार
बल्लारपूर
. येथील राणी लक्ष्मी वार्डात एका घराच्या बाहेर दुचाकी वाहन ठेवले होते.त्या कुटुंबातील सदस्य रात्री झोपी गेले.दरम्यान रात्री २ वाजता दरम्यान ते जागे झाले.त्यावेळी त्यांची दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. आगीच्या भक्षस्थानी आलेली दुचाकी जळून खाक झाली.या घटनेमुळे दुचाकी चालकात एकच खळबळ माजली आहे. दुचाकी जळीत प्रकरणाची अज्ञात आरोपी विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात दुचाकी मालकाने तक्रार केली आहे.
. बल्लारपूर येथील राणी लक्ष्मी वार्डातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते आलोक प्रेमाचंद साळवे यांनी आपली दुचाकी क्र. एम.एच.34- ए.जे.3528 घरासमोर ठेवली होती. नेहमीप्रमाणे ते घरासमोर दुचाकी ठेवून झोपी गेले.दरम्यान रात्री २ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने दुचाकीला आग लावून पळ काढला. त्यावेळी घराजवळील लोकांना दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी जळणाऱ्या दुचाकीवर पाणी टाकून आग विझवण्याच्या प्रयत्न केला. ही बाब आलोक साळवे यांच्या लक्षात आली.त्यावेळी पूर्णपने दुचाकी आगीच्या भक्षस्थानी आली होती.
. या घटनेची तक्रार आलोक साळवे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.


