Home पोलीस डायरी दोन सरपंचासह उपसरपंच अडकले एसीबी च्या जाळ्यात

दोन सरपंचासह उपसरपंच अडकले एसीबी च्या जाळ्यात

871
  • नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही
  • चिमुर तालुक्यातील घटना

तालुका प्रतिनधी
चिमूर

गावातील शाळेचे विविध काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून बिलासाठी लाच मागणारे चिमूर तालुक्यातील बोरगाव ( बुट्टी )चे सरपंच रामदास चौधरी (39), उपसरपंच हरीश गायकवाड (45) व आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके (30) यांना 12 सप्टेंबरला चिमूर येथे मटेरियल पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून 41 हजार रुपयांची लाच घेतांना नागपूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे चिमूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव (बुट्टी) चे सरपंच, उपसरपंच व आंबेनेरीच्या सरपंचास उमरेड येथील ठेकेदाराकडे देयकाच्या रकमेच्या एकूण पाच टक्के अर्थात 78,600 रु. ची लाच मागणी केली. उमरेड येथील तक्रारदार हे ठेकेदारी काम करत असून त्यांच्या पत्नीकडे कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र असल्याने त्यांना ग्रामपंचायत आंबेनेरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे विविध कामाचे मटेरियल पुरवण्याचे टेंडर प्राप्त झाले होते. प्राप्त टेंडरप्रमाणे तक्रारदार यांनी मटेरियल पुरविले. पुरविलेल्या मटेरिअलचे देयके, धनादेश देण्याकरिता तक्रारदार यांना एकूण बिलाच्या 5 टक्के रकमेची संदीप दोडके यांनी पंचासमक्ष लाच मागणी केली. शेवटी तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडून 12 सप्टेंबर रोजी चिमूर येथे स्वतः करीता 2 टक्के व उपसरपंच यांचे करीता 1 टक्के असे एकूण लाच रक्कम रुपये 41 हजार रु. पंचासमक्ष स्विकारताना संदीप दोडके यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

यावेळी त्यांच्या सोबत असलेले रामदास चौधरी, हरीश गायकवाड यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. सदर प्रकरणात पो.स्टे चिमूर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, पर्यवेक्षण अधिकारी वाचक अनामिका मिर्झापुरे, पोलिस उपअधीक्षक, नागपुर परीक्षेत्र, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा मते पोलीस निरीक्षक आशिष / चौधरी, सहा. फौ. सुरेंद्र शिरसाट, पोहवा अनिल बहिरे, पोना अमोल मेंघरे, म. ना. पोशि अस्मिता मल्लेलवार, चालक पो. हवा. अश्लेंद्र शुक्ला, शारिक अहमद यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!