Home सांस्कृतिक आ. प्रतिभा धानोरकर यांनी अनुभवला शालेय विद्यार्थ्यांच्या कबड्डीचा थरार

आ. प्रतिभा धानोरकर यांनी अनुभवला शालेय विद्यार्थ्यांच्या कबड्डीचा थरार

879

वरोरा

.        वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज वरोरा येथे झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या कबड्डी स्पर्धेत उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या खेळाचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत वरोरा तालुक्यातील 17 शाळांमधील 17 संघांनी भाग घेतला. स्पर्धेत मुले आणि मुली दोघेही सहभागी झाले होते. स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण झाली.

.        यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.

.        यावेळी तहसीलदार कौटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजू चिकटे, संयोजक तालुका वरोरा गणेश मुसळे, बाबाराव आगलावे, अनिल घुबडे, निखिल टीपले उपस्थित होते.

 

error: Content is protected !!