अखेर अर्धवट बंधार्‍याने घेतला इसमाचा बळी

186
  • घरी जात असताना नदीत गेला वाहून
  • इसमाचा शोध सुरू
  • भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील घटना

चंद्रपुर
.        दिवसभर जनावरे चारून सायंकाळी घरी परत जाण्यासाठी निघालेला गुराखी शिर नदी ओलांडून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि वाहून गेल्याची घटना भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली . कवडू येटे (६५) असे मृतकाचे नाव आहे . त्या गुराखी इसमाचा बळी नंदोरी येथे अर्धवट असलेल्या बंधार्‍यानेच  झाला असल्याचा आरोप यावेळी उपस्थित गावकर्‍यानी केला .
.        भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील कवडू येटे हे नंदोरी गावातील शिर नदीच्या पलीकडे असलेल्या इंदिरा नगर वसाहतीत आपल्या पत्नी व मुलासह राहत होते . नेहमीप्रमाणे ते दिवसभर जनावरे चारून सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान शिर नदीच्या पात्रातून आपल्या घरी परत जात होते . शिर नदीतून जात नदीच्या पात्रातपाणी कमी होते . ते शिर नदीच्या मधोमध असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाण्यात वाहून गेले . ही घटना प्रत्यक्ष त्याच इंदिरा नगर वसाहतीतून नंदोरी गावाकडे येत असलेल्या डवरे नावाच्या व्यक्तीच्या लक्षात आले . त्यांनी आरडाओरड केल्या नंतर गावकर्यांडनी नदी जवळ एकच गर्दी केली होती तर . नदी जवळ राहत असलेल्या युवकांनी कवडू येटे यांचा शोध घेण्यासाठी तात्काळ नदीत उड्या घेत शोध मोहीम राबविली .यात नंदोरी येथील तंटामुक्त समितीचे युवा अध्यक्ष आशुतोष घाटे, चंदू मडावी , अक्षय लांबट , प्रवीण नागपुरे यांनी पोहत शोध घेतला मात्र कवडू येटे यांचा शोध लागला नाही . याबाबत ठाणेदार अमोल काचोरे यांना माहिती देण्यात आली . सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव व त्यांचे सहकारी प्रवीण रामटेके व राकेश सोनुणे घटनास्थळी दाखल झाले . रात्रीची वेळ झाल्याने कवडू येटे यांचा शोध घेणे कठीण असल्याचे सांगत ते परत गेले .

ग्रामपंचायत चे वेळकाढू धोरण

.        नंदोरी येथे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती बसविल्या जातात . गुरुवारी गणेश विसर्जन होणार असल्याने गणेश मंडळानी गणेश विसर्जन करण्यासाठी नदी जवळ लाईटची व्यवस्था करण्यासाठी सांगितले होते मात्र . वेळकाढू धोरण असलेल्या ग्रामपंचायत ने याकडे दुर्लक्ष केले . आणि ज्या ठिकाणी गणेश विसर्जन होणार होते नेमके त्याच ठिकाणावरून कवडू येटे हे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली . या घटनेनंतर ग्रामपंचायत ला जाग आली आणि लाईट लावण्यात आला .

 

                     बंधारा आणखी किती जीव घेणार                                                                                                .         भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शिर नदीच्या पलीकडे मागील ३५ वर्षापासून इंदिरा नगर वसाहत आहे . येथे ३० कुटुंब वास्तवात आहे. मात्र अद्यापही येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन शिर नदी ओलांडून घरी जावे लागते . या वसाहतीतील नागरिकांना जाण्या येण्यासाठी पाच वर्षापूर्वी चांदा ते बांदा योजने अंतर्गत १ कोटी ८८ लाख रुपयाचा बंधारा मंजूर झाला प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात ही झाली मात्र या बंधार्या.च्या कामात राजकारण आले आणि राजकीय नेत्याच्या धुडघुशीमुळे बंधार्यााच्या कामाला संथगती मिळाली आणि बंधाऱ्याचे अर्धवट काम सोडून ठेकेदार पसार झाला. तेव्हापासून या बंधार्यादकडे कोणीही लक्ष घातले नाही . ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे यांनी उठाठेव करीत तत्कालीन जलसंपादन मंत्री जयंत पाटील यांना पत्र व्यवहार केला त्यानंतर त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले . आणि या बधार्यायचे काम नव्या कंत्राटदाराला देण्यात आले मात्र त्या कंत्राटदाराला अजूनही वर्क ऑर्डर आला दिला नसल्याने काम सुरू केले नसल्याचे त्या कंत्राटदाराकडून सांगितल्या जाते .                                                                 .        शिर नदीवर होणारा बंधारा राजकारणात अडकल्याने इंदिरा नगर वसाहतीतील नागरिकांना अजूनही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे . याचाच बळी बुधवारी येथील गुराखी कवडू येटे हे झाल्याचा आरोप यावेळी नंदोरी वासीयांनी केला असून हा बंधारा आणखी किती जीव घेणार हे मात्र सांगता येत नाही .