Home सामाजिक आधुनिक काळात संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज – डॉ. गोपीचंद गजभे

आधुनिक काळात संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज – डॉ. गोपीचंद गजभे

1248

बोथली (सिरपुर) येथे दोन दिवसीय नागदिवाळी उत्सव साजरा

नेरी : संपूर्ण विश्वावर आधुनिक काळानी झडप घातली असून पारंपरिक जाती धर्माचे समाजाचे रीतिरिवाज हद्दपार होताना दिसत आहेत. अनेक परंपरा रूढी चालीरीती संपल्यात जमा झाल्या आहेत. यामुळे स्वतःच्या समाजात जन्माला आल्यावर आपली व आपल्या समाजाची परंपरा संस्कृती काय आहे ? याची ओळख किंवा माहिती या युगातील नवतरुणांना येणाऱ्या पिढ्याना राहणार नाही. यासाठी या आधुनिक काळात संस्कृती चे जतन करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. गोपीचंद गजभे यांनी बोथली येथील आयोजित दोन दिवसीय नागदिवाळीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

.     नेरी जवळील बोथली येथे दि 24 व 25 डिसें ला आदिवासी माना जमात मंडळ व विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुक्ताई व नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परिसर स्वच्छ करून मूठ पूजा करून सुरवात करण्यात आली. यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू व सक्षमीकरण कार्यक्रम घेण्यात आले. लगेच मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यानंतर रात्रौ शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि 25 ला सकाळी पूजा अर्चा करून माँ मानिकादेवी च्या प्रतिमेची मिरवणूक डी जे च्या तालावर वाजत गाजत महिलांच्या आकर्षित नुत्यांने संपूर्ण गावातून मानिकादेवी च्या जयघोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला पुरुषांनी आकर्षक वस्त्र परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले वाजत गाजत रॅली ची मिरवणुकीची सांगता गुरुदेव सेवा मंडळात करण्यात आली. या नंतर लगेच मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

.       या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोपीचंद गजभे तर अध्यक्ष म्हणून काजळसर चे सरपंच आशिष ननावरे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून सरपंच मनोहर चौधरी, योगेश सहारे, माणिक सहारे, केशव चौखे, नथ्थुजी धारणे, गजानन चौधरी, प्रमोद चौधरी, तानाजी चौखे, शेषराव दडमल, दिलिप चौधरी प्रभाताई दडमल, उर्मिला चौधरी, सिकंदर चौधरी, विकास सरपाते, आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते.

.     या प्रसंगी इलेक्ट्रो होमिओपॅथी या क्षेत्रात संशोधक म्हणून देशाच्या नामवंत प्रतिष्ठित संशोधकाच्या यादीत स्थान मिळवून आपले व समाजाचे नावलौकिक केल्याबद्दल डॉ. गोपीचंद गजभे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी माना आदिम जमातीच्या परंपरा संस्कृती चालीरीती रूढी यावर मार्गदर्शन करीत माहिती समाज बांधवांना दिली. अनेक मान्यवरांनी समाजातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बाबीवर प्रकाश टाकला रात्रीला चंद्रपूर येथील समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्य मान्यवर आणि आदिवासी, माना समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक गावकरी उपस्थित होते महाप्रसादाने दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!