Home सामाजिक सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी

सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी

1207

नायब तहसिलदार सुरेश साळवे

विसापूर ग्रामपंचायत मध्ये शिबीर

विसापूर : महसूल प्रशासन जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. गावागावात सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान केंद व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना नागरिकांच्या फायद्याच्या आहे. याचा उपयोग जनतेला व्हावा,हा उद्देश आहे.सुशासन सप्ताह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील नायब तहसिलदार सुरेश साळवे यांनी विसापूर येथे केले.

.    बल्लारपूर उपविभागीय, तहसील व ग्रामपंचायत कार्यालयच्या संयुक्त विद्यमाने ‘ प्रशासन गाव की और ‘ अंतर्गत विसापूर येथे शिबीर पार पडले.यावेळी उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी शिबीरात उपस्थित नागरिकांना विविध दाखल्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार सुरेश साळवे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, मंडळ अधिकारी किशोर नवले, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, तलाठी आरती दुलत, अजय नौकरकर, दिपक निंबाळकर, शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षदा टोंगे आदींची उपस्थिती होती.

.     यावेळी राष्टपीता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून सुशासन सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे उद्घघाटन सुरेश साळवे यांनी केले. दरम्यान उपस्थित नागरिकांना विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अनेकश्वर मेश्राम यांनी, तर कार्यक्रमाचे संचालन संतोष निपुंगे यांनी केले. आभार प्रदर्शन किशोर धकाते यांनी केले.

error: Content is protected !!