जीएमआर एनर्जी लि. व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन चा उपक्रम
वरोरा : जीएमआर वरोरा एनर्जी लि. व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन यांनी डॉ. हेडगेवार ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने जीएमआर वरोरा एनर्जी लि. येथील प्लांट कॅन्टीनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन आले. या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी रक्तदान करीत कर्तव्य बजावले.
. या रक्तदान शिवीराचे उद्घाटन सीओओ थर्मल धनंजय देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. तर उदघाटन प्रसंगी भरत पिंजरकर, उप प्लांट प्रमुख, अमित भावे यांच्यासह सर्व एचओडी. डॉ. मदन केटे व . किरण इंगळे, रक्तपेढी अधिकारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर उपस्थित होते. सीओओ थर्मल धनंजय देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना रक्तदानाच्या महत्त्वावर भर दिला आणि वैयक्तिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत येणाऱ्या क्रियाकलापांपैकी रक्त दान हे विशेष कार्य आहे जे जीएमआर कंपनी द्वारे वर्षातून दोनदा आयोजित केला जातो असे त्यांनी संबोधित केले.
. यावेळी मुख्य सीए विनोद पुसदकर, प्रवीण शेट्टी, हेड ईएचएस, इब्राहिम शेख, प्रभारी ऑपरेशन अँड केमिस्ट्री, अमित अग्रवाल, हेड आयटी, महेश महापात्रा, हेड इलेक्ट्रिकल, श्रीनिवासन नायर, हेड रक्सा , विवेक ढोके, प्रमुख सीएचपी, दीपक दास, प्रमुख केमिस्ट्री उपस्थित होते.
. शिबिरासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे 12 डॉक्टर व 12 कर्मचारी उपस्थित होते. 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान कार्यक्रमात सहभाग घेतला आणि शेवटी 83 युनिट रक्त संकलित करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना डॉ. हेडगेवार ब्लड बँक नागपूर यांच्या तर्फे प्रशस्तीपत्र व त्यांच्या शरीराला उर्जा देण्यासाठी फळे व आरोग्यदायी पेय देण्यात आले.


