नागभीड : तालुक्यातील धर्मराज कन्या विद्यालय, नवेगाव पांडव येथे दोन दिवशीय 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
. या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी शिक्षण संस्था मोहाळी (मो.) चे माला देशमुख, होत्या तर प्रमुख मार्गदर्शक संतोष रडके, डॉ. अतुल नागपुरे, मनोज लडके, गोपीनाथ भोयर, अमित देशमुख, भंडारे , शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका पपिता चावरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, पी.जी. बोरकुटे, बी.टी. पांडव, डी. आर.नन्नावरे, पी. आर. उरकुडे, अर्जुंकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


