Home सामाजिक वासेरा येथे दोन दिवसीय वाल्मिकी जयंतीचे आयोजन

वासेरा येथे दोन दिवसीय वाल्मिकी जयंतीचे आयोजन

1267

सिंदेवाही :- रामायणाचे रचीयता वाल्मिकी ऋषी यांचा जन्म आश्विन पौर्णिमेला झाला असून या दिवसाचे औचित्य साधून ढीवर समाज वासेरा यांचे वतीने २३ आणि २४ डिसेंबरला दोन दिवसीय महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

.     वाल्मीक ऋषी यांचे जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सामान्य नव्हते. त्यांनी जीवनातील एका घटनेने प्रेरित होऊन आपला जीवन मार्ग बदलला. आणि महर्षी वाल्मिकी ऋषी झाले. वासेरा येथील ढीवर समाजाच्या वतीने वाल्मिकी मत्सपालन सहकारी संस्था मर्यादित संस्था येथे दोन दिवसीय जयंती महोत्सव आयोजित केला आहे.

.     यानिमित्ताने २३ डिसेंबरला सकाळी ग्रामासफाई, घटस्थापना, गुरुदेव सेवक मुखरुजी मारभाते यांचे हस्ते होम हवन पूजा, दुपारी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम. सायंकाळी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक. २४ डिसेंबर रोजी सकाळी ग्रमासफाई , दुपारी मान्यवर पाहुण्याचे मनोगत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. याकरिता सर्वोदय महाविद्यालयचे प्राचार्य राजेश डाहरे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अमरावती चे प्रा. अरुण मेश्राम, दीवर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण सहारे, ग्राम दर्शन महाविद्यालय चे प्राध्यापक सदाशिव मेश्राम, सिंदेवाही येथील नगरसेविका मीनाक्षी मेश्राम, वासेरा ग्राम पंचायत सरपंच दिलीप मेश्राम इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

.       सायंकाळी गोपालकाला करून रात्री संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व ढीवर समाजाच्या नागरिकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाल्मिकी मत्सपालान सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद मेश्राम, सचिव किशोर मेश्राम , सदस्य राजेंद्र मेश्राम, प्रशांत शेंडे, सुधाकर पोहनकर इत्यादींनी केले आहे.

error: Content is protected !!