भद्रावती येथे विवेकानंद संगीत कला अकादमीचे उद्घाटन
भद्रावती : आजच्या काळात जर संगीत नसते तर मनुष्याच्या जीवनातील मनोरंजनाचा अविभाज्य भाग गेला असता. आनंदप्राप्तीसाठी, मनःशांतीसाठी संगीताचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. जर संगीत नसते तर आपण स्वरांची सुमधुरता कधीच अनुभवू शकलो नसतो. संगीतामुळे माणसाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती विकसित होते.हे लक्षात घेऊन विवेकानंद संगीत कला अकादमी सुरू करण्यात आली. असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (काॅन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालय परिसरात सुरू करण्यात आलेल्या विवेकानंद संगीत कला अकादमीचे उद्घाटन करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
. यावेळी मंचावर डॉ यशवंत घुमे, जेष्ठ नागरिक गुलाब झुंगरे, उध्दव आसुटकर उपस्थित होते. पुढे बोलताना स्वान म्हणाले की, “संगीत अकादमीतून दर्जेदार कलावंत तयार होण्यासाठी संस्थेकडून जी मदत लागेल ती केली जाईल. विद्यार्थ्यांनी प्रचंड परीश्रम घेऊन उत्कृष्ट कलावंत व्हावे व शहराच्या नावलौकिकात भर टाकावी” असे विचार मांडले.यावेळी उपस्थित शिक्षणार्थी विद्यार्थी कलावंतांनी भावगीते, भजन, अभंग, सिनेगीत गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. या अकादमीत झी टिव्हीवरील अनेक मालिकांमध्ये संगीतकार म्हणून काम पाहणारे अमीत लभाने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमीत लभाने, संचालन व आभारप्रदर्शन प्रा. श्रीकांत दाते यांनी केले. यावेळी झनकजी चौधरी, पुंडलिक ढोके, वामन वाढई, वेदांत कुलते, राखी खारटकर, लक्ष्मी बावणे, अक्षय रॉय, प्रा. धनंजय बेलगांवकर, प्रा. सुभाष खोके, प्रा.राजू बैरम, लक्ष्मी बावणे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


