चिमूर : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दर मंगळवारी सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण केल्या जात आहे. श्री हनुमान चालीसा प्रसारक मंडळ, खडसंगी चे सेवक यात संचालन करीत असतात. या प्रसंगी रमेश कंचलवार , डॉ. दीपक दडमल , कैलाश धनोरे, मोहन समर्थ, हरिकृष्ण कामडी आदी उपस्थित होते. दर मंगळवारी या हनुमान चालीसा पठणाला शेकडो भाविकांची गर्दी असतात.


