मुख्याध्यापक दिनेश वरघणे यांचे प्रतिपादन
विसापूर येथे संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव
विसापूर : महाराष्ट्र राज्यात समकालीन संतांच्या मालिकेत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाच्या हितासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी तेली समाज समाजाला साद घातली. त्यांच्या कार्याचे अनुकरण करताना नवी दिशा मिळाली. संत तुकाराम महाराज व संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रेरणेमुळे समाज जीवनात बदल घडण्यास मदत झाली. त्यांच्या कार्याचा वारसा मिळाली आहे. आजही त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे तेली समाजाच्यावतीने पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधन कार्यक्रम दरम्यान ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे अध्यक्ष नरेंद्र इटनकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे, बल्लारपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, अक्षय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर, अरूण बावणे, अमोल खनके,सुरेश इटनकर यांची उपस्थिती होती.
. दरम्यान श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची पुजा अर्चना व मालार्पण करून माजी सरपंच बंडू गिरडकर व माजी सैनिक रामदास हरणे यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आले. उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कविता गिरडकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी वरघणे, रविना ठाकरे, मोनिका शेंडे, अनिता कुहिटे, मनिषा ढेंगरे, सविता इटनकर यांची उपस्थिती होती. यावेळी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. समाज बांधवाच्या वतीने गावातील संत, महापुरुषांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश इटनकर यांनी केले.आभार विठ्ठल साखरकर यांनी मानले. यावेळी समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


