नागभीड : संविधान बचाव व संविधान सन्मान प्रचार व प्रसार अभियान राबविण्यासाठी व पुढील समाजपरिवर्तनाची ज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारमंच संघटनेची स्थापना जेष्ठ कार्यकर्ते हिराचंद बारसागडे यांचें अध्यक्षतेखाली आंबेडकरी विचारवंत डि.एन शेंडे यांचे उपस्थित नुकतीच बाळापूर तळोधी येथे पार पडली.
. या सभेमध्ये सर्वसंमतीने फुले- शाहु- आंबेडकर विचारमंच नावाची संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेचे अध्यक्ष विनोद लांडगे तळोधी, कार्याध्यक्ष प्रा. विलास वानखेडे, सचिव प्रेमदास जनबंधू, सहसचिव आनंद शेन्डे गोविदपूर, यादवराव रामटेके, राहुल रामटेके जनकापूर, संजय सोरते, मनोहर गजभिये, संघटक प्रा. नरेन्द्र सोनटक्के नागभीड, मनिष शेन्डे पळसगाव, नंदकिशोर रामटेके कोजबी, अक्षय मेश्राम धामणगांव, आनंद सोनटक्के किटाळी, सुनिल रामटेके आलेवाही, इंद्रजित राऊत कोजबी, चंद्रभान रामटेके कन्हाळगांव, जिवन शेन्डे येनोली, डोमाजी रामटेके सावरगांव, मेघश्याम जनबंधु चारगांव, हरिदास बारसागडे चक, अरुण बारसागडे सावरगांव, प्रदिप मेश्राम किटाळी, दुवादास मेश्रान गोविन्दपूर, अशोक शेन्डे गोविन्दपूर, मच्छिन्द्र खोब्रागडे गिरगांव, हरिदास मेश्राम चिखलगांव, सिध्दार्थ चव्हाण वाढोणा, गौतम टेंभूर्णे जीवनापूर, दिगंबर डेकाटे हेटी(गंगा), कमलाकर रामटेके पळसगांव, धर्माराव गेडाम येनोली, प्रकाश रामटेके ओवाळा, मुकेश खोब्रागडे मांगरूड, निलेश जिवने कोजबी याप्रमाणे संघटनेची कार्यकारिणी सर्व गावांतील कार्यकर्तेना प्रतिनिधित्व देऊन गठीत करण्यात आली.
. गावागावात जाऊन संविधान जागृती व समाजपरिवर्तन करण्यासाठीं एकदिलाने कार्य करण्याचा मानसं यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन प्रा. वानखेडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पी.के. जनबंधू यांनी मानले. या सभेला परिसरातील बहुसंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


