गरीब होतकरू मुलीच्या निवडीबद्दल कळमगावात आनंदोत्सव
नेरी : जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाने चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील शेतकरी कुटुंबातील राणीची चंद्रपूर न्यायालयात कनिष्ठ पदावर निवड झाली. तिच्या निवडीने कलमगावात आनंदोत्सव साजरा केल्या जात आहे.
. चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील गरीब शेतकरी कुटूंबातील रानी सुखदेव चौधरी हिने न्यायालयाच्या लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण करीत घवघवीत यश मिळविले. तिची चंद्रपूर न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक पदावर निवड झाली.
कळमगाव ची राणी ही अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तीने हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून स्पर्धापरीक्षातुन यश संपादन करण्याचे ठरवीत अभ्यासाला सुरवात केली. अनेक परीक्षा दिल्या. जिद्द मेहनत चिकाटी व कठोर परिश्रमाने तिने न्यायालयाच्या शासकीय सेवेतील परीक्षेत यश संपादन करीत न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक पदावर निवड पक्की केली. तिच्या या यशाबद्दल गावकरी तसेच अनेक मान्यवरांनी तिच्या घरी जाऊन सत्कार करून गौरव केला.
. यात विठ्ठल सावरकर विदर्भ प्रांत सेवाधिकारी गुरुकुज आश्रम मोझरी अशोक चरडे चंद्रपूर, सेवाधिकारी एन एस भोयर चिमूर तालुका सेवाधिकारी यांनी स्वागत सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. तसेच इथेच न थांबता पुढील जीवनात अनेक यश प्राप्त करून गावाचा नावलौकिक वाढवावा तसेच स्वतःची व समाजाची प्रगती करावी असा उपदेश देत शुभेच्छा दिल्या. यावेळी सुखदेव चौधरी, संध्या चौधरी, गणेश चौधरी, ज्ञानदीप भोयर, किसन चौधरी, कवडू लांडे, आकाश चौधरी आदी उपस्थित होते.


