Home सामाजिक ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करत बाबासाहेबांना अभिवादन

६८ रक्तदात्यांनी रक्तदान करत बाबासाहेबांना अभिवादन

1277

नागवंश युथ फोर्सचा रक्तदान उपक्रम

राजुरा : नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

.      संविधान चौक, राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर दोन रांगेत नियोजनबद्ध रॅलीद्वारे बुध्दभूमी, राजुरा येथे त्रिशरण व पंचशील स्वीकारत अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच कोमल फुसाटे व सुनील मेश्राम यांनी भोजन दान केले.

.    यावेळी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वैद्यकीय अधीक्षक गणेश तुपेकर, वैद्यकीय अधिकारी यश जोगी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उत्तम सावंत, परिचारक दुर्गादास गिरे, पल्लवी पवार, पूजा गायकवाड व चालक रुपेश घुमे यांनी रक्तदान प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. अमोल राऊत, धनराज उमरे, रवी बावणे,रवी झाडे, नूतन ब्राम्हणे,निखील वनकर, युवराज कातकर, सुरेंद्र फुसाटे, जय खोब्रागडे, प्रणित झाडे, सागर चाहांदे, आकाश नळे, प्रमोद देठे, राहुल सूर्यवंशी, गौरव रामटेके, सुधीर मेश्राम, राजहंस वानखेडे,नितीन कांबळे,गणेश देवगडे,दिक्षित मेश्राम,अविनाश सुर्यवंशी,आदर्श तेलंग, संघपाल देठे, राहूल अंबादे, उत्कर्ष गायकवाड, डॉ.बांबोळे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!