Home सामाजिक पळसगाव येथे बाबासाहेबांना अभिवादन 

पळसगाव येथे बाबासाहेबांना अभिवादन

1289

नेरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पळसगाव येथील अखिल भारतीय बौद्ध समाज यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

.      नालंदा बौद्ध विहारा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून  प्रत्येकजण हातात ‘मेणबत्ती घेऊन विहाराजवळ आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत मेणबत्ती लावण्यात आली. त्यानंतर महापुरुषांना पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. धम्मध्वजाचे ध्वजारोहन करून सामुहिक बुद्धवंदना घेऊन त्रिशरण पंचशीला ग्रहण करण्यात आले.

.      यावेळी सरपंच सरिता गुरनुले, पोलीस पाटील रागीना दडमल, दुर्योधन खोब्रागडे, कणीलालं ढोक, नरेश पाटील, प्रदीप गजभिये, सिद्धार्थ रामटेके,हॅपीज शेख, जयवन्ता रामटेके, लता खोब्रागडे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

error: Content is protected !!