Home सामाजिक भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली

1323

सिंदेवाही : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे केवळ आदरणीयच नाहीत, तर ते एक विचारवंत आणि सुधारक देखील होते. त्यांनी समतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि जाती आधारित भेदभाव निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अशा या थोर विभूतीला ६ डिसेंबर दिनी भारतीय बौध्द महासभा शहर शाखा सिंदेवाही यांचे वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

.      डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रख्यात, जागतिक कीर्तीचे विद्वान महापुरुष होते. त्यांनी या देशातल्या तमाम बहुजन समाजासाठी आपले जीवन अर्पण केले आहे. त्यांच्या त्यागाने सर्व मानवजातीला आदराचे स्थान मिळाले आहे. त्यांचे महापरिनिर्वाण दिनी सिंदेवाही येथील भंते शोभित मैत्रेय बुद्ध विहार येथे भारतीय बौध्द महासभा महिला आघाडी शहर अध्यक्षा संगिता खोब्रागडे यांचे नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

.      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बौद्ध सेवा समितीच्या अध्यक्षा मंदा भैसारे, यांचे उपस्थीतीत सचिव श्रावण नागदेवते, सुर्याजित खोब्रागडे, हिरालाल इंदुरकर, संघपाल डांगे, शांताबाई पाजारे, भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका अध्यक्षा शुभांगी खोब्रागडे, शहर महिला अध्यक्षा संगिता खोब्रागडे, रीता पोपटे, जयश्री गेडाम, वनिता लोणारे, तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस जगदीश सेमस्कार, तसेच असंख्य उपासक, उपसिका, उपस्थित होते.

.      यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा जागर करून बाबासाहेबांच्या कार्याचा गाढा पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन समोर येणे, हीच बाबासाहेबाना खरी आदरांजली ठरेल, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी बारसागडे, तर रीता पोपटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!