Home सामाजिक ८ डिसेंबरला महावीर भवन वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिर

८ डिसेंबरला महावीर भवन वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिर

1311

रोटरी क्लब वरोरा व शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

वरोरा : येथील शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लबच्या वतीने सरकारी रक्तपेढी चंद्रपूर यांच्या मार्फत डोंगरवार चौकातील महावीर भवन येथे रविवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.     वर्धा, नागपूर या शहरातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढी मध्ये फक्त २० ते २५  टक्के  रक्त उपलब्ध होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शैषरत्न बहुउद्देशीय संस्था वरोरा आणि रोटरी क्लब वरोरा यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी स्वतःचे कर्तव्य समजून  पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू, डिलिव्हरी रुग्णां सोबतच अपघात ग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. यामुळे सदर शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शेषरत्न बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष धिरज लाकडे व रोटरी क्लब ऑफ वरोरा अध्यक्ष बंडु देऊळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!