गडचांदुर : अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून सीएसआर अंतर्गत बैलमपूर व मानोली गांवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 170 नागरिकांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला.
. या शिबिरात हिमोग्लोबिन, सिकलसेल, शुगर, बी पी, एच आई व्ही, बायोचेमिस्टरी आणि सी बी सी या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील आस्मा पठाण, विद्या धोबे आणि आरोग्य सहकारी उपस्थित होते. या दरम्यान तपासण्यात आलेल्या रक्त चाचणीत दोष आढळून आल्यास त्यावर योग्य तो उपचार करण्यात येईल असे प्रतिपादन गामीण रुग्णालय गडचांदूर च्या आस्मा पठाण यांनी केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका व शाळेतील शिक्षकांचा सहयोग लाभला. गावकऱ्यांनी माणिकगड कंपनीचे आभार मानले.


