Home सामाजिक सावरगाव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

सावरगाव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

1327

नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथील ज्ञानदीप कॅम्प्युटर तथा ग्राहक सेवा केंद्र येथे शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.

.      कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

.      याप्रसंगी तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साहित्यिक राजेश बारसागडे, ज्ञानदीप कॅम्प्युटर व ग्राहक सेवा केंद्राचे संचालक तथा पत्रकार सुभाष गजभे, राज कॅम्पुटर वाढोणाचे संचालक राज खोब्रागडे, तळोधी पत्रकार संघाचे सहसचिव तुलोपचंद गेडाम, श्रीराम फायनान्सचे एबिएम अमोल बारसागडे, जेष्ट नागरिक बाबुराव बोरकर, देविदास मेश्राम, शुभांगी सुभाष गजभे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!