Home सामाजिक नंदोरीत दोन दिवशीय पुरूषांचे भव्य कबड्डी सामने

नंदोरीत दोन दिवशीय पुरूषांचे भव्य कबड्डी सामने

1300

चंद्रपुर : वरिष्ठ हनुमान क्रीडा मंडळ नंदोरी बु च्या वतीने पुरुषांचे भव्य कबड्डी सामने 5 व 6 डिसेंबर ला आयोजित करण्यात आले आहे. सरकारी दवाखानाच्या भव्य पटंगणात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता व्ही.सी. सी. पी. एल नंदोरी खुर्द चे संचालक चंद्रकांत वासाडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

.      या कबड्डी सामन्याच्या अध्यक्षस्थानी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे सभापती विजय देवतळे, पंचायत समिती भद्रवती चे माजी सभापती प्रविण ठेंगणे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट, माजी उपसरपंच भानूदास ढवस, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शुभम चांभारे, पोलिस स्टेशन वरोरा चे पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साठम, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आकाश भागडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य किशोर उमरे, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, वरिष्ठ हनुमान क्रीडा मंडळ नंदोरी बु अध्यक्ष तथा तंटामुक्त समिती नंदोरी चे आशितोष घाटे व ग्रामपंचायत सदस्य गण आणि गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

.      या कबड्डी सामन्यांमध्ये नियम राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही, पंचाचा निर्णय अंतिम राहील, काही नियम व अटी मंडळाकडे राखीव राहील, ओव्हर वेट फोटोमध्ये नसल्यास संघ बाद करण्यात येईल, ग्राऊंड वेट होणार नाही, पंचांचा निर्णय अंतिम राहील, नशापाणी घेऊन खेळणार्‍या व अरेरावी करणार्‍या मंडळास बाद करण्यात येईल.

error: Content is protected !!