Home सामाजिक गडचांदूरच्या विकासाचा वादा – आ. देवराव भोंगडे

गडचांदूरच्या विकासाचा वादा – आ. देवराव भोंगडे

1306

गडचांदूर : राजुरा विधानसभेला दहा ते पंधरा वर्ष आमदार राहूनही दोन्ही माजी आमदारांनी गडचांदूर शहराच्या विकासाला पाने पुसली असून, यावेडी गडचांदूरचा मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला तळा जाऊ देणार नाही, गडचांदूर शहराचा विकास हेच माझे ध्येय असून, गडचांदूर शहराच्या विकासाचा वादा म्हणजेच देवराव दादा असे उदगार नवनियुक्त आ. देवराव भोंगडे यांनी सत्कार समारंभला उत्तर देताना काढलेत.

.      गडचांदूर शहर भाजपच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ व मतदाराचे आभार कार्यक्रमात आ. देवराव भोंगडे बोलत होते. काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या माजी आमदाराच्या कार्यावर तासेरे ओढीत,गडचांदूर शहराचा विकास खुटल्याचे त्यांनी मान्य केले, येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गडचांदूर शहराच्या विकासासाठी सर्वतोपारी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, शहर अध्यक्ष अरविंद डोहे, महेश शर्मा, सतीश उपलिंचीवार, रोहन काकडे या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

.     नवनियुक्त आमदाराच्या प्रथम आगमना प्रसंगी विजयी रॅलीने नागरिकांचे गडचांदूर शहरात उत्साहाचे वातावरण होते, नागरिकांनी जागोजागी नवनियुक्त आ. देवराव भोंगडे यांचे जंगी स्वागत केले. गडचांदूर वासियांनी विकासाचा मुद्धा समोर करून भाजपच्या देवराव भोंगडे यांच्यावर विश्वास दाखविला, मात्र नवनियुक्त आ. देवराव भोंगडे कितपत गडचांदूर वासियांच्या अपेक्षेवर खरे उतरतात हे येणारा काळचं ठरवेल.

error: Content is protected !!