बालाजी मंदिर वरोरा येथे जन्माष्टमी उत्सव थाटात

39

वरोरा – माहेश्वरी समाजातर्फे जन्माष्टमीनिमित्त बालाजी मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती. जरबेरा, गुलाब अशा फुलांनी सजवलेला भगवान श्रीकृष्णाचा मनमोहक झुला सर्व भाविकांचे मन मोहून टाकत होता. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत सर्व भाविकांनी भजनाचा आस्वाद घेतला, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म मोठ्या थाटामाटात झाला. हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की च्या घोषणांनी मंदिर दुमदुमून गेले. आरतीनंतर नंद उत्सवाचा आनंद सर्वांनी, लहान मुलांनी व ज्येष्ठांनी घेतला, त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.