- वाघिणीपासून तीनही बछडे दुरावले होते
- वाघिणीचा शोध सुरू
चंद्रपुर
वाघिणीपासून दुरावलेल्या पाच महिन्याच्या बछड्याचा शनिवारी ताडोबातील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. या बछड्याने वाघिणीपासून दुरावल्यानंतर अन्नपाणी सोडले होते. शनिवारी त्याला नागपूर येथे हलविण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून दुरावलेल्या दोन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, तर तिसरा पाच महिन्याचा बछडा गंभीर स्थितीत होता. त्याचेवर ताडोबातील वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्याचाही मृत्यू झाला.
मध्य चांदा वनविभाग अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी हे कळमणा उपक्षेत्रामध्ये 07 सप्टेंबर ला गस्ती वर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसुन आला. त्याला तात्काळ रेसक्यु करुन उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले होते. तिथे डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर 07 सप्टेंबर पासुन उपचार सुरु केले होते.
सदर बछडा हा खुप अशक्त असल्याने त्याने खाद्य सोडले होते व पाणी सुध्दा पित नव्हता. त्यामुळे सदर बछडयाला सलाईनवर ठेवण्यात आले होते. बछडयाचे रक्तातातील साखरेचे प्रमाण कमी झाले होते आणी रक्त युरिया व रक्त शोषक पातळी मध्ये वाढ झाल्याचे रक्त चाचणी मध्ये आढळुन आले होते. त्यामुळे सदर बछडा हा उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. उपचारा दरम्यान दिनांक 09 सप्टेंबर ला बछडाचा मृत्यु झाला.
मृत बछडाचे शवविच्छेदन वनाधिकारी यांचे समक्ष डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर व डॉ. दिलीप पी. जांभुळे, पशुधन विकास अधिकारी, बल्हारपुर यांनी केले व त्यानंतर मृत बछडाला वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे दहन करण्यात आले.. दरम्यान, तीन दिवसांपासून वाघिणदेखील बेपत्ता आहे. तिच्या शोधार्थ वनपथक तथा ‘कॅमेरा ट्रॅप’ जंगलात लावण्यात आले आहे. मात्र, अजूनही वाघिणीचा शोध लागलेला नाही.

