नागभीड : जेष्ठ समाजसेवक कुष्ठारोगी अंध अपंग मूकबधिर युवकांचे प्रेरणास्थान तसेच सचिव महारोगी सेवा समिती आनंदवनचे ड्रॉ. विकास आमटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गो. वा. कला वाणिज्य महाविद्यालय नागभीड येथें पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.
. कोटगांव येथील प्रमोद नागापुरे हे वरोरा येथील आनंद निकेतन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कर्मचारी आहेत. त्यांना समाजकार्यत आवड असल्याने ते विविध उपक्रम राबवित असतात. कोटगांव येथे सुद्धा विविध उपक्रम राबविले. एवढेच नाहीतर वरोरा तालुक्यातील काही गावामध्ये वृक्षरोपण सारखे उपक्रम राबविले. अनेकांना मदतीचा हात देतात.
. नागभीड येथील गोविंदराव वारजूकर महाविद्यालय नागभीड येथें ड्रॉ. विकास आमटे लिखित पुस्तकांचा संच महाविद्यालयाला भेट म्हणून देण्यात आला. यात आनंदवन प्रयोगवान पुस्तक, विकास पर्व अमृत महोत्सव गौरव गाथा ग्रन्थ, आनंदवन सेवेचे रामायम, आनंदवन स्मार्ट विलेज, स्वरांनंद वन आणी काही इतर पुस्तकांचा संच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ड्रॉ. चंद्रशेखर हनुवणते यांना भेट देण्यात आला.
. यावेळी कृषक विद्यालयाचे मुख्याध्यापक नीलकंठ ठाकरे, सुरज भेंडारकर गव्हर्टमेंट कॉन्ट्रॅक्टर, आनंद मेश्राम पत्रकार उपस्थित होते.


