Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात विशेष मतदार नोंदणी शिबिर

लोकमान्य महाविद्यालयात विशेष मतदार नोंदणी शिबिर

831

वरोरा
वरोरा तहसील कार्यालय वरोराच्या निवडणूक विभागाने मतदार यादी मध्ये नाव नोंदविण्याकरता विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे करण्यात आले होते.
सदर शिबिरा मध्ये अठरा वर्षावरील 91 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 82 नवीन विद्यार्थ्यांचे नमुना सहा तसेच नाव दुरुस्ती करिता पाच विद्यार्थ्याचे नमुना आठ भरून घेण्यात आले. विशेष शिबिरात नायब तहसीलदार मधुकर काळे अव्वल कारकून नितीन काळे यांनी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी बाबत मार्गदर्शन केले .
यावेळी लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य सिंग प्राध्यापक लोणकर रोहित लिगाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!