Home सामाजिक खा. धानोरकरांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन 

खा. धानोरकरांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

1337

भद्रावती : तालुक्यातील मौजा चंदनखेडा व नंदोरी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडला.

.      तालुक्यातील चंदनखेडा हे गाव मोठे असून गावात आदिवासी समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या आहे. सदर समाज बांधवा करिता कोणतीही सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता सभा मंडप किंवा समाज भवन नसल्याने चंदनखेडा या गावचे सरपंच नयन जांभुळे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. या बाबीची दखल घेऊन मौजा चंदनखेडा येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी समाज सभागृह ची बांधकाम मंजूर करून दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भूमिपूजन सोहळा पार पडला.

.      यावेळी चंदनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच नयन जांभुळे तसेच उपसरपंच भारती उरकांडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत काळे, सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, सुमित मुडेवार ,बंडू कारमेंगे, ईश्वर धांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य मुक्ता सोनुले, बंडू निखाते, रंजना हनवते, प्रतिभा दोहतरे, श्वेता भोयर, सविता गायकवाड, नाना बगळे, निकेश भागवत, आशा नन्नवरे तसेच ग्रामवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!