Home सामाजिक रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा भिक मांगो आंदोलन करणार –  अभिजित कुडे

रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा भिक मांगो आंदोलन करणार –  अभिजित कुडे

828
  •  भिकेची रक्कम मुख्यमंत्र्यांना पाठविणार

वरोरा

तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे . रस्त्यासाठी निवेदने आंदोलने करण्यात आली . त्या नंतर काही रस्ते मंजूर झाले पण अजूनही कामाला सुरुवात झाली नाही.  शासनाकडून बांधकाम विभागाला निधी उपलब्ध होत नसेल तर आम्ही भीक मांगो आंदोलन करून जमा झालेली रक्कम  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवू असे निवेदन तहसीलदार  वरोरा मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

खराब रस्त्यामुळे अनेक गावातील बससेवा बंद झाली आहे. याचा  विद्यार्थ्यांना नाहक  त्रास सहन करावा लागत आहे.   खासगी वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे . यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हा प्रश्न पडला आहे.  रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे बस बंद होतात.  मात्र प्रशासनाला जाग येत नाही . .  या साठी विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता  बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना  च्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.   नागरी, माढेळी, उखर्डा,  वाघनख, महाडोळी, शेगाव, चीकणी, बामर्डा,  आजनगाव, बोपापुर, वडगाव, केळी, हीवरा, उमरी, बोरगाव, बोर्डा, चारगाव,  पवणी व सर्व रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.  या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा भीक मांगो आंदोलन करून ते पैसे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला यावेळी प्रतिभा मांडवकर सरपंच तथा युवती जिल्हा अधिकारी, निखिल मांडवकर, रोशन भोयर, आदित्य जूनघरे  आदी उपस्थित होते….

error: Content is protected !!